Court Hammer | (Photo Credits-File Photo)

Virar Hospital Fire:  वसई सत्र न्यायालयाने शुक्रवारी डॉ. दिलीप बस्तीमल शाह आणि डॉ. शैलेश धरमदेव पाठक यांचा जामीन फेटाळून लावला आहे. तर विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातील एकजण चीफ एक्झिक्युटिव्ह आणि दुसरा चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयु विभागात लागलेल्या आगीप्रकरणी 15 कोविडच्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोघांना 23 एप्रिलला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रमोद बदाख यांनी त्यांचे जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून व आरोपींनी अग्निसुरक्षा उपायांचे पालन केले नसल्याचे तपासात नमूद करत त्यासाठी विरोध दर्शवला आहे.(Virar Hospital Fire Incident: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून विजय वल्लभ कोविड केअर हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणी शोक व्यक्त)

गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना कोविड19 रुग्णालयात फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देशन दिले होते. तर समर्पित रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून चार आठवड्यांत ना हरकत प्रमाणपत्र मागण्याचे निर्देशही दिले होते आणि असे करण्यात आले नाही की दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले होते. हे प्रमाणपत्र अग्निशमन दलाला देणे हे रुग्णालयाच्या मालकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कधीही तपासणीसाठी आले असता तेथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाही ते पाहता येते.(Virar Hospital Fire: विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी दोन प्रशासकांना अटक)

दरम्यान, विजय वल्लभ रुग्णालयातील आगीप्रकरणी PMNRF कडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत तर गंभीररित्या जखमींच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.