Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  काळात माणुसकीला सोडून देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासहित अनेक राजकीय मंडळींनी वारंवार केले आहे, मात्र तरीही कित्येक ठिकाणी अधिक कमाईच्या मागे लागून काही जण बोगस मास्कचा (Low Quality Mask) व्यवसाय करताना दिसत आहेत. असाच एक नवा प्रकार विरार मधून समोर आला आहे. विरार मध्ये अलीकडेच निकृष्ट आणि बोगस एन-95 मास्कचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना पोलीसांनी बेड्या देखेल ठोकल्या आहेत. याबाबत पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने कारवाई केल्याचे समजतेय. भारतीय रेल्वेकडून 40 हजार लीटर हॅन्ड सॅनिटायझर, 6 लाख फेसमास्क ची निर्मिती

प्राप्त माहितीनुसार, विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरात एका घरात एन-95 च्या बोगस मास्कची साठेबाजी केल्याची माहिती पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून गडगापाडा येथील घरात छापा मारला. याठिकाणी तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मास्कचा साठा करण्यात आला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मास्क धुवून, या मास्कला इस्त्री करायचे आणि या मास्कची पुन्हा विक्री करत होते. याप्रकरणी पोलीस सविस्तर तपास करत आहेत. Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई

यापूर्वी देखील अनेकदा अशीच प्रकरणे समोर आली आहेत, अलिकडेच चारकोप पोलिसांनी सुमारे 10,000 हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करत 2 जणांना ताब्यात घेतलं होतं. तर पुण्यात सुद्धा मार्च महिन्यात एका गोडाऊनवर पुणे क्राइम ब्रांच कडून धाड टाकून मोठ्या स्वरूपात मास्कचा काळा बाजर होत असल्याचे प्रकरण उघड करण्यात आले होते. Coronavirus Outbreak: मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्यात संकटकाळात मास्कचा तुटवडा भासू नये याची सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे, मात्र अशा काळाबाजाराच्या घटनांमुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. असे करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आरोग्य आणि पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी याआधीच सूचित केले आहे.