महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही राजकीय पक्षांमध्ये आगामी विधानसभा लक्षात घेता त्यासाठी घौडदौड सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युती यांनी सुद्धा विधानसभेची तयारी करण्यास सुरुवात केली असून दोन्ही पक्षांनी अर्ध्या-अर्ध्या जागा लढवण्याचे ठरवले आहे. परंतु तरीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि भाजपाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत बोलून जागा वाटपासंदर्भात ठरवणार आहोत असल्याची भुमिका आज मांडली आहे.
भाजप-शिवसेने जरी अर्ध्या अर्ध्या जागा वाटून लढवण्याचा निर्णय घेतला असला तरीही काही जागांबाबत बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता फडणीस आणि अमित शहा यांच्या सोबत उद्धव ठाकरे जागा वाटपाचा फॉर्म्युल्याबद्दल नेमके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी युतीच्या मार्गावर वळत असून काहींनी विधानसभापूर्वीच भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे.(छगन भुजबळ यांना शिवसेनेत एन्ट्री नाही, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन)
त्याचसोबत आज बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तरे यांच्या हातात शिवबंधन बांधण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला दिवसेंदिवस धक्के बसत असून या निवडणुकीत पुन्हा युती सरकार बाजी मारणार असी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर लवकरच अजून राष्ट्रवादीचे तीन आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.