मुंबई-अहमदाबाद हायवे वरील वर्सोवा खाडीपूल आज 7 तास बंद राहणार
Image For Representation (Photo Credits-Facebook)

मुंबई-अहमदाबाद हायवे वरील घोडबंदर जंक्शनजवळ वर्सोवा खाडीपूल (Versova Creek Bridge) आज (5 मार्च) 7 तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मीरा-भायंदर डिव्हिजनच्या ट्राफिक विभागातील सिनियर इन्सपेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा खाडी पूल हा 49 वर्ष जूना आहे. आता या पूलाची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणार्‍या वाहतूकीची मोठी कोंडी होणार आहे. दरम्यान आज सकाली 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये वर्सोवा खाडी पूलावरून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांना मुंबई मार्गे पूलावरून जाण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. या मार्गावरून वाहनांना अप आणि डाऊन दिशेने जाण्यासाठी रस्ता खुला असेल. Vashi Bridge Traffic: वाशी उड्डाण पुलावर दोन डंपरच्या धडकेने भीषण अपघात; मुंबई कडे येणार्‍या मार्गावर वाहतुकीची कोंडी

दरम्यान वर्सोवा खाडीपूल बंद असल्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आता पालघर जिल्ह्यातून सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान ठाणे ग्रामीण भागातूनही खास पोलिस वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. 7 अधिकारी आणि 60 ट्राफिक कॉन्स्टेबल यांच्यासोबत हायवे सिक्युरिटी फोर्स देखील वाहनचालकांना दिशा दाखवण्यासाठी उभे राहणार आहेत. तर विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांना सुरळीत मार्ग करून देण्यासाठी पालघर पोलिस तैनात असतील.

दरम्यान आज सकाळी नवी मुंबईमध्ये वाशी खाडी पूलावर डंपरमध्ये धडक झाल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. वाशी नजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी किंग्स सर्कल जवळ हाईट बॅरियरला गाडीचा धक्का बसल्याने पूलाचा भाग कोसळला होता. सध्या मुंबई भागातील अनेक भागांमध्ये पूलांच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.