Versova Beach (Photo Credits: ANI)

महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Birth Anniversary) दिनाचे औचित्य साधून आज देशभरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. आता नागरिकांचा प्रतिसाद जितका उल्लेखनीय होता तितकाच चांगला प्रतिसाद पर्यावरण कार्यकर्त्यांनीही दाखवला. गांधीजींच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वर्सोवा बीच (Versova Beach)स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. यात मोहीमेत मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते. लोकांचा हा उत्साह पाहता असे दर आठवड्याला झाल्यास गांधीजींचे 'स्वच्छ भारताचे' स्वप्न लवकरच पुर्ण होईल, असा विश्वास पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शाह यांनी व्यक्त केला आहे.

महात्मा गांधींजींचे विचार त्यांची शिकवण आजच्या तसेच पुढील पिढीला कळावी यासाठी आज बरेच उपक्रम राबविण्यात आले. कुठे रेल्वेवर गांधीजींचे विचार दिसू लागले तर कुठे स्वच्छता अभियान. यात सोशल मिडियावरही गांधीजींविषयी अनेक पोस्ट पाहण्यात आल्या. त्यातच मुंबईतील लोकप्रिय असा वर्सोवा बीच स्वच्छ करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. यात लोकांचा प्रतिसाद त्यांचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. हे पाहता असे उपक्रम दर आठवड्याला राबविण्यात आले तर, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल असा विश्वास अफरोज शाह यांनी व्यक्त केला आहे.

ANI चे ट्विट:

तसेच 'देशावर प्रेम करा आणि अशाच पद्धतीने तुमचे प्रेम व्यक्त करा, जय हिंद, जय महाराष्ट्र बोला सुद्धा आणि अशा मोहीमेत सहभागी सुद्धा व्हा असा सल्ला अफरोज शाह यांनी दिला आहे.'

हेही वाचा- आजपासून 'Single Use' प्लास्टिक ला देशभरात बंदी

महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आजपासून (2 ऑक्टोबर) सिंगल युज प्लास्टिकवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले, झेंडे, फुलांचे पॉट्स, बाटल्या, स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.