महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आजपासून (2 ऑक्टोबर) सिंगल युज प्लास्टिकवर पुर्णपणे बंदीचे आवाहन करण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणा-या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. तर पुण्यामध्ये 100% प्लास्टिक बंदीची घोषणा अतिक्रमण विभागाचे अधिकारी माधव जगताप यांनी केली आहे. प्लास्टिक बंदीची घोषणा याआधीच करण्यात आली होती. मात्र ब-याच ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत होता. प्लास्टिक बंदीबाबत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पर्यावरण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले, झेंडे, फुलांचे पॉट्स, बाटल्या, स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा- Plastic Ban: प्लास्टिक वापरल्यास नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड
देशभरात ही प्लास्टिक बंदीचे आवाहन याआधीच करण्यात आले होते. तर पुण्यामध्ये सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्याची विक्री अथवा वापर करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून 5,000 रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर देशभरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.