Vasai Virar Bus Service (Photo Credits: wikimedia Commons)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) गेल्या 7 महिन्यांपासून ठप्प झालेली महाराष्ट्रातील परिवहन सेवा हळूहळूी पूर्वपदावर येत आहे. यात वसई-विरार (Vasai Virar) शहरातील परिवहन सेवा येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा नव्याने आपल्या सेवेसाठी रुजू होणार आहे. परिवहन सेवेच्या मनमानी करणा-या ठेकेदाराची पालिकेने हकालपट्टी केल्यानंतर या मेसर्स एसएनएन या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, या कंपनीसोबत पालिकेचा करार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. वसई-विरार करांसाठी ही आनंदाची बातमी असून दैनंदिन जीवनात प्रवासासाठी सुलभ ठरणारी परिवहन सेवा लवकर सुरु होत असल्याने येथील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिवहन सेवेचा जुन्या ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरु होता. पालिकेने या ठेकेदाराला गॅरेज आणि बसेससाठी जागाही उपलब्ध करुन दिली होती. मात्र या ठेकेदाराने या बसेसमध्ये विशेष बदल केले नाही. तसेच बसेसचा दर्जा देखील निकृष्ट होता. त्यामुळे प्रवाशासंह रस्त्यावरील लोकांनाही वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत होता.

हेदेखील वाचा- दिवाळी निमित्त पुणे महापालिकेकडून Firecrackers फोडण्यासंदर्भात नियमावली जाहीर

त्याचबरोबर कोरोनाचे कारण पुढे करत या ठेकेदाराने ही बससेवा पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे वसई-विरार येथील लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्र अनलॉकच्या टप्प्यात आलेला असताना देखील या ठेकेदाराने बससेवा सुरु केली नाही. त्यामुळे बसेस नसल्याने नोकरदार वर्गाला कामावर जाता येत नव्हते.

यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अखेर पालिकेने या ठेकेदाराची हकालपट्टी करत नवीन ठेकेदाराला बससेवा देण्यात आली आहे.

येत्या 1 डिसेंबरपासून वसई-विरार परिवहन सेवा प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.