दिवाळीचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात ही काही नियमांचे पालन करावे लागणार आहेत. तर मुंबई नंतर आता पुणे महापालिने फटाके वाजवण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीमधील परिसरात फटाके फोडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.(मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने नागरिकांकडून आतापर्यंत 4.78 कोटी रुपयांच्या दंडाची वसूली)
पुणे महापालिकेने पुढे असे ही म्हटले आहे की, शाळा, उद्याने किंवा मैदाने अशा ठिकाणी फटाके वाजवण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. परंतु खासगी ठिकाणी कमी आवाजाचे आणि कमी प्रदुषण करणारे फटाके उडवण्यास परवानगी दिली गेली आहे. त्याचसोबत फटाके फोडताना कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा पालन करावे लागणार आहे. मात्र दिवाळीच्या काळात सॅनिटायर हे ज्वलनशील असल्याने हात धुण्यासाठी त्या ऐवजी साबणाचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन ही महापालिकेकडून करण्यात आले आहे.(Firecrackers Ban in Mumbai: दिवाळी मध्ये यंदा लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी केवळ 2 तास फुलझडी, अनार उडवण्यास परवानगी; BMC ने जारी केली नियमावली)
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधता त्यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करावी असे आवाहन ही केले. राज्यात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी जबदादर नागरिक म्हणून कमी प्रदुषण करणारे फटाके उडवावेत असे ही स्पष्ट केले आहे. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी मात्र फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण कोरोनाची परिस्थिती पाहता आणि थंडीचे दिवसासह प्रदुषण निर्माण झाल्यास कोरोना अधिक सक्रिय होऊन नागरिकांच्या प्रकृतीवर घात करण्याची अधिक शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.