Santosh Deshmukh | X

बारावीची परीक्षा ही करियरच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे अनेकजण या परीक्षेसाठी मेहनत करत असतो. बीड मध्ये मस्साजोगच्या हत्या झालेल्या संतोष देशमुख () यांच्या लेकीने वडिलांच्या निर्घुण हत्येचं दु:ख सावरून बारावीची यंदा परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये वैभवी देशमुखला (Vaibhavi Deshmukh) घवघवीत यश मिळालं आहे. आज जाहीर झालेल्या निकालामध्ये वैभवीला बारावीला 85.33% मिळाले आहेत. वैभवीने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. 600 पैकी तिला 512 गुण मिळाले आहेत.

डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येनंतर दोनच महिन्यात वैभवी बारावीच्या परीक्षेला सामोरी गेली. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे मीडीयाला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. यावेळी तिने 'आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे,' अशी खंत तिने व्यक्त केली होती. काल वैभवीने नीट ची देखील परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्रात यंदा बारावीचा निकाल 91.88% लागला आहे. या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज? 

संतोष देशमुख हत्या प्रकरण

संतोष देशमुख हे बीडच्या मस्साजोगचे सरपंच होते. डिसेंबर 2024 मध्ये त्यांची खंडणीला विरोध केल्याने निर्घुण पणे हत्या करणयात आली आहे. त्यांना अमानुषपणे मारण्यात आल्याचे काही व्हिडिओ, फोटो पाहून सारा महाराष्ट्र हळहळला होता. सध्या या प्रकरणामध्ये वाल्मिक कर्‍हाड हा मुख्य आरोपी आहे. अद्याप एक आरोपी या प्रकरणामध्ये फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी जनमाणसांमध्ये भावना आहे.