Coronavirus (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबई आणि पुणे शहरात पाहायला मिळाला होता. मात्र, मुंबई पाठोपाठ आता पुण्यातहीं कोरोना अटोक्यात असल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. एकीकडे ही आकडेवारी पाहून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे कोरोना प्रतिबंध लशीचा अपुऱ्या साठ्यामुळे नागरिक पुन्हा चिंतेत पडले आहेत. याचपार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिका (PMC) क्षेत्रातील सर्व लसीकरण (Corona Vaccination) केंद्रांवर उद्या (22 मे) लसीकरण होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

लसींचा पुरवठा न झाल्याने शनिवारी 22 मे 2021 रोजी पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. पुणे मनपास लस प्राप्त झाल्यावर पुढील नियोजन जाहीर केले जाणार आहे. पुणेकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे ट्वीट पुणे महानगर पालिकेने केले आहे. हे देखीला वाचा- Dilip Walse Patil: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

ट्वीट-

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिस आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी इन्जेक्शन मात्र पुरेशी उपलब्ध नाहीत. यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. या इन्जेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा करत आहोत. परंतु, कंपन्यांना सर्व इन्जेक्शन केंद्राकडे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते थेट राज्यांना देऊ शकत नाहीत, असे अजित पवार म्हणाले आहेत.