Aaditya Thackeray And Joe Biden (Photo Credit: Facebook)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या (US Presidential Election 2020) निकालाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संपूर्ण जगातून जो बायडन यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. यातच महाराष्ट्राचे पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण जागतिक पर्यावरण कराराचे पालन कराल अशी आपक्षा आहे. असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 20 इल्कट्रोल व्होट्स मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण इलेक्ट्रोल मतांची संख्या 264 वरुन 284 झाली आहे. हा निकाल लक्षात घेता जो बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील यात काहीही शंका नाही, असोसिएडेड प्रेस अर्थात AP ने म्हटले आहे. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतल्याचे समजले. हे देखील वाचा Jayant Patil on Nanar Refinery Project: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले नाणार प्रकल्प रद्द होण्याचे कारण

अदित्य ठाकरे यांचे ट्विट-

या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जो बायडन यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवलं हा मी माझा बहुमान समजतो. तसेच तुम्ही मला मत दिले असो किंवा नसो मी सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगले काम करणार, अशा आशयाचे ट्विट जो बायडन यांनी केले आहे.