नागपूर मध्यवर्थी कारागहात (Nagpur Central Jail) एका गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका बलात्कार प्रकरणात याच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका सहकैद्यावर हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित कैदी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदांतर्गत (पोक्सो) न्यायालयीन कोठडीमध्ये असल्याची माहिती आहे. रोहण भोईरीदास असे आरोपीचे नाव आहे. पीडिताने केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराची तातडीने दखल घेत विशेष पोक्सो न्यायालयाने धंतोली पोलिसांना आदेश दिले आहेत की, आरोपीची वैद्यकीय चाचणी करावी आणि त्यासंदर्भातील अहवाल आज (3 जुलै) दुपारपर्यंत न्यायालयाला सादर करावा.
रोहण भोईरीदास हा बलात्काराच्या एका प्रकरणात आगोदरच दोषी आहे. त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. कारागृहातील रुग्णालयात त्याला इतर कैद्यांच्या देखभालीसाठी त्याला ठेवण्यात आले होते. पीडित कैद्याची प्रकृती बरी नव्हती त्यामुळे त्याला सेंट्रल जेल परिसरातीलच रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पीडित कैदी रुग्णालयात गेला असता आरोपी रोहण याने पीडित कैद्याला औषध गोळ्या देण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. त्यानंतर त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
आरोपीने पीडिताला लैंगिक अत्याचार करताना मारहाणही केली. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार घडल्यानंतर पीडित कैद्याची प्रकृती आणि स्थिती अधिकच गंभीर झाली होती. त्याच्यासोबत काहीतरी अघोरी प्रकार घडला असावा असा संशय येत होता. त्यानंतर त्याच्याकडे चौकसी केली असता त्याने सोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला. पोलिसांनी पीडित कैद्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर तिथेही कैद्याने त्याच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. कोर्टाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पोलिसांना चौकशी करण्याचे आणि त्याबाबतचा एक अहवाल आज दुपारर्यंत सादर करण्याचे आदेश दिले.
घडल्या प्रकारामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच, बलात्कार प्रकरणात आगोदरच शिक्षा भोगत असलेल्या कैद्यावर कारागृहातील रुग्णालयात रुग्णांवर देखरेख ठेवण्याचे काम कसे सोपवता येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातो आहे. तसेच, या कैद्याने या आधीही इतर कैद्यांसोबत असे काही प्रकार केले आहेत का? याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.