Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्षासह बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानुसार राज्यातील एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: 10 वी, 12 वी बोर्ड परिक्षेचा रिझल्ट विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर पाहता येणार, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता)

महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्याचे, नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत. पण आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळावा लागणार आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्चिततेची भीती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही हे स्पष्ट होत आहे.(महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्या-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारकडे मागणी)

शिक्षण हे जीवनावश्यक आहे. आपली मुले शिकत राहिली पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण सुलभतेने घरच्या घरी कसे दिले जाईल. त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम्स अशा पर्यायांचाही विचार करावा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती त्यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी असे म्हटले आहे की, कुलगुरूंसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच वारंवार चर्चा करण्यात येत आहेत. त्या-त्या प्रदेशातील परिस्थिती समजावून घेतली जात आहे. यात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करतो आहोत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून प्रयत्न करतो आहोत. परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यायांचा विचार केला जात आहे.