सध्या देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातल्याने शैक्षणिक वर्षासह बोर्ड परिक्षांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिले जाणार असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु निकाल कधी लागणार याकडे आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 12 वी बोर्ड परिक्षेच्या सर्व विषयांचे पेपर पूर्ण झाले. परंतु 10 वी चा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला.(Maharashtra SSC Result 2020: भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार)
राज्यात जवळजवळ 10 वी आणि 12 वी परिक्षेसाठी 15 लाख विद्यार्थी बसले होते. परंतु विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट्स पाहण्यास सांगण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असली तरीही बोर्डाच्या परिक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल येत्या 10 जून पर्यंत लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC, HSC प्रमाणेच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे यंदाचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात?)
महाराष्ट्र 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांसह पालकांना mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्सचा वापर करा-
-निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
-Board Results ऑप्शनवर क्लिक करा
-MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल
- विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा
-रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे
-रिजल्ट दिसल्यावर त्याची प्रत Save करा
महाराष्ट् राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ देणार नाही असे स्पष्ट केले होते. तसेच अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत होणार आहेत. त्या आधीच्या सत्रातील परीक्षा होणार नाहीत. परंतु त्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. लॉकडाऊन वाढल्यास अंतिम सत्राच्या परीक्षांचा पण 20 जून नंतर आढावा घेण्यात येईल असे ही उदय सामंत यांनी म्हटले आहे.