महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अॅन्ड हायर सेकेंडरी एज्युकेशन (MSBSHSE) यांनी असा निर्णय घेतला आहे की, 10 वी चा भुगोलाचा (Geography) विषयाचा पेपर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना भुगोलाच्या पेपरसाठी सरासरी गुण दिले जाणार आहेत. परिक्षा 23 मार्चला पार पडणार होती. महाराष्ट्रातील जवळजवळ 1.7 दशलक्ष विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परिक्षेसाठी बसले होते. ही परिक्षा मार्च 3 ते मार्च 23 पर्यंत पार पडणार होती.
भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्यानंतर बोर्डाने 10 वीच्या इतर विषयांच्या पेपरसाठी सुद्धा सरासरी मार्क दिले जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत एक परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले होते. त्याचसोबत विविध पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विषय परिक्षेच्या बाबत सुद्धा असाच नियम लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तोंडी, लेखी, प्रॅक्टिकल आणि इंनटरनल गुण सुद्धा सरासरी देण्यात येणार आहेत.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC, HSC प्रमाणेच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे यंदाचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात?)
-निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
-बोर्ड रिजल्ट ऑप्शनवर क्लिक करा
-MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल
- विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा
-रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे
-रिजल्ट दिल्यावर त्याची प्रत सेव्ह करा
Maharashtra SSC: १० वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल भाषेच्या पेपर मध्ये देणार सरसरी गुण- Watch Video
MSBSHSE यांनी अद्याप महाराष्ट्र एससी 2020 चा निकाल कधी जाहीर होणार याची तारिख स्पष्ट केलेली नाही.