Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता धोका पाहता आता 15 जूनपासून आगामी शैक्षणिक वर्ष कसं सुरु करायचं? हा प्रश्न सरकारपुढे आहे. दरम्यान याबाबत चर्चा करताना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पर्याय पुढे आहे. पण अनेक ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात, दुर्गम भागात ई लर्निंग शक्य नसल्याने आता त्याला पर्याय शोधले आहेत. आज महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दुरदर्शनवर 12 तास आणि रेडिओवर 2 तासाच्या विशेष स्लॉटची मागणी केली. यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच ते कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित देखील राहु शकतील असं सांगण्यात आलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी त्याबाबत केंद्रीय मंत्री प्र्काश जावडेकर यांना पत्र  लिहले आहे. बालभारतीने सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी आधीच पहिली ते बारावी पर्यंतची पुस्तकं पीडीएफ स्वरूपात मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध केली आहेत. तसेच राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे देखील त्यांनी उद्घाटन केले आहे.

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट

डीडी नॅशनलचे 16 चॅनेल्स आहेत. दरम्यान हे फ्री टू एअर असल्याने त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची महत्त्वाची माहिती दिली जाऊ शकते. ई लर्गिंगसाठी उपकरण ( किमान स्मार्टफोन) आणि इंटरनेटची उत्तम सोय असणं आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी हे शक्य नाही. त्यामुळे टेलिव्हिजन, रेडिओचा विचार केला जावा असं सूचवण्यात आलं आहे.