Maha Career Portal (PC - Twitter)

कोरोना व्हायरच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे (Maha Career Portal) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले आहे.

करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली. (हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल - हसन मुश्रीफ)

‘महा करिअर पोर्टल’चा राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती . http://mahacareerportal.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याशिवाय अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी विषयी माहिती या पोर्टलवर विद्यार्थ्यांना मिळणार आहे.