प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचचली जात आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र काही समाजकंटांकडून कोरोनााच्या पार्श्वभुमीवर नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबईतील सांताक्रुझ येथे मणिपूरच्या एका महिलेवर एक दुचाकीस्वार थुंकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत विविध जातीधर्माचे लोक राहत आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासकरुन काही जणांना कोरोनाची लक्षणे जरी आढळून आली असली तरीही त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. मात्र ही बाब अत्यंत चुकीची असून सरकारने याच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता चीनी जातीच्या लोकांना नागरिक शिव्या घालत असून त्यांच्यावर थुंकण्याचे प्रकार समोर आले असून त्यात आता भर पडली आहे. मुंबईतील मणिपुरच्या एका महिलेवर ती रस्त्याने चालत असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिच्यावर थुंकल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी दिल्लीत सुद्धा असाच प्रकार समोर आला होता. (Coronavirus: पुणे येथे आणखी कोरोना व्हायरसचे 37 रुग्ण आढळल्याने आकडा 141 वर पोहचला)

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी समाजाचे भान ठेवून वागावे तर नागरिक एकमेकांवर थुंकत असल्याचे घाणेरडे प्रकार समोर येत आहेत. तसेच डॉक्टरांना आणि पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना ही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे गैरवर्तन किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याचा फटका तुम्हाला भविष्यात नोकरी किंवा अन्य सरकारी कामाच्या वेळी बसू शकतो हे लक्षात ठेवा.