अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ लढवणार रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक
Deepak Nikalje (Photo: Facebook)

शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाने (Republican Party of India) देखील आज उमेदवार यादी जाहीर केली आहे . रिपब्लिकन पक्षाने एकूण 6 जागा लढविण्याचे जाहीर केले असून त्यातील एका उमेदवाराचे नाव सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) भाऊ दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांना पक्षाकडून फलटण मतदार संघाचे तिकीट मिळाले आहे. ते रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांना मुंबईतील चेंबूर येथील मतदार संघाचे तिकीट हवे होते. परंतु शिवसेनेने ती जागा आपल्या खात्यात ठेवल्याने रिपाइंने त्यांना फलटणमधून तिकीट देण्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, 'मोदींच्या टीममध्ये दाऊदचा माणूस आहे व गुजरातमध्ये जसं गुंडांना पोसलं जात तसं महाराष्ट्रमध्येही होत आहे'.

दीपक निकाळजेंसोबतच रिपाईच्या आणखी 3 उमेदवारांची नावे देखील रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जाहिर केली आहेत. त्यामधील मुंबईतून गौतम सोनावणे, पाथरीमधून मोहन फड आणि नायगाव येथून राजेश पवार यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.