भाजप (संग्रहित प्रतिमा)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या (Shivsena) अन्य आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्यातील उद्धव सरकार अडचणीत सापडले आहे. तर महाराष्ट्रात दुसरीकडे मात्र ते वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सर्व स्तरावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बंडखोर आमदारांना गुवाहाटी येथे हलवण्यात आले आहे.  एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 बंडखोर आमदार आणि 7 अपक्षही पोहोचले आहेत. हेही वाचा  Maharashtra Political Crisis: शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद; Eknath Shinde यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याची Sanjay Raut यांची माहिती

आता या सर्व घटनेवर भाजपचे उपाध्यक्ष कृपा शंकर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या 36 तासांत महाराष्ट्रातून समोर आलेल्या घडामोडींवरून ठाकरे सरकार प्रचंड राजकीय संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. पक्ष एकसंध ठेवण्यात उद्धव अपयशी ठरले आहे. भाजपची यात कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले.