Maharashtra Political Crisis: शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद; Eknath Shinde यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याची Sanjay Raut यांची माहिती
Sanjay Raut | PC: Twitter/ANI

विधानपरिषद निवडणूकीचा निकाल लागताच शिवसेनेमध्ये बंडाळी झाल्याचं समोर आलं आणि पुढील काही तासांतच राजकीय घडामोडींनी वेग घेतला. शिवसेनेचे निष्ठावान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली 35 पेक्षा अधिक सेना आमदारांनी बंड पुकारल्याचं समोर आलं आहे आणि आता सेनेकडून या बंडावर फुंकर घालण्याचं काम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आपल्यासोबत असल्याचं सांगत नवा गट स्थापन करत असल्याचा इशारा दिला आहे. यावर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: 'तेरा घमंड चार दिना का..' शिवसेनेच्या Sanjay Raut यांच्या निवासस्थाना बाहेर बॅनरबाजी.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपाला दिलेल्या इशारा मध्ये शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या घटनांमधून फार फार सरकार कोसळेल पण पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे आणि ती जपण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान काल सुरत मधून एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला दाखल झाले आहेत. आता हे नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी ते राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. पण राज्यपालांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. बंडखोर आमदारांना शिवसेनेचा कॉंग्रेस, एनसीपी सोबत असलेला घरोबा पसंत नसल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडून दबाव टाकला जात आहे.