Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (4 फेब्रुवारी) कोकण दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात त्यांनी सावंतवाडी (Sawantwadi) येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान आणि इशारा दिला. ते म्हणाले, 'आज आमच्यावर नाहक कारवाई करता आहात. पण, थांबा. आमचेही दिवस येतील. त्या वेळी पाहू, असे म्हणत एक दीर्घ पॉझ घेत चक्रवाढ व्याजासह हिशोब चुकता केला जाईल, असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला. याच वेळी गद्दारी आणि हुकुमशाही सर्वांनी एकत्र येऊन गाढूया, असे अवाहन जनतेला केले. आज माझ्याकडे काहीच नाही. मी रिकामा आहे. माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले. असे असले तरी लढवय्या शिवसैनिक आणि सामान्य जनता माझ्यासोबत आहे. चाल करुन यायचे तर या मी आपल्या समोर उभा आहे, असे थेट आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.

'मिंधे गँग विरुद्ध भाजप गँग संघर्ष'

राज्यामध्ये सध्या कायद्याचे राज्य राहिले नाही. राज्य सरकारमध्येच गँगवॉर सुरु आहे. मिंधे गँग विरुद्ध भाजप गँग असा संघर्ष पाहायला मिळतो आहे. तिसरी गँग सत्तर हजार कोटींच्या कथीत भ्रष्टाचारात बुडाली आहे त्यामुळे अतायप तिचे काही पुढे आले नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उल्हासनगर येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, स्वत: गोळीबार करणारा भाजप आमदारच सांगतो मिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. असे असताना मोदींची गॅरेंटी या गद्दारांना पावणार का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, Uddhav Thackeray Konkan Visit: उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर, बारसूलाही देणार भेट)

भाजपने सांगावे त्यांचे हिंदूत्त्व काय?

आम्ही कालही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच असणार आहोत. आमचे हिंदूत्व स्पष्ट आहे. हाताला काम जय श्रीराम. हे आमचे हिंदू आहे. आमचे हिंदूत्त्व कोणाचाही द्वेश करत नाही. धर्माधर्मांमध्ये भाडणे लावत नाही. सर्व धर्माचा आदर करणारे असे आमचे हिंदूत्त्व आहे. त्यामुळे जे आम्हाला सांगतात हिंदुत्त्व सोडले त्यांना माझा एक प्रश्न आहे. आम्ही आमचे हिंदूत्त्व स्पष्ट केले आहे. भाजपने सांगावे त्यांचे हिंदूत्त्व काय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले  ( Uddhav Thackeray Approaches Supreme Court: उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान)

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळ आले. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असे असताना मी स्वत: येथे आलो होतो. सरकारी निकषांच्याही पुढे जात आम्ही कोकणवासीयांना मदत केली. असे असताना केंद्र सरकारने कोकणला किती मदत केली? जी मदत केली ती सर्व गुजरातला केली. माझा कोकणचा शेतकरी तसाच रिकामा राहिला. आम्ही राज्य म्हणून त्याला कमतरता पडू दिली नाही. मात्र, असे असले तरीही आज अनेकांना कोकणबद्दल अकारण प्रेम आले आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.