Uddhav Thackeray Konkan Visit: उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर, बारसूलाही देणार भेट
Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर (Konkan Visit) जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या बारसू या गावालाही भेट देणार आहेत. कोकण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याशिवाय,  देवदर्शनही करणार आहेत.  ( Uddhav Thackeray Approaches Supreme Court: उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान)

उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडी देवी दर्शन, कणकवली असा दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू,राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत.

कोकण दौऱ्यात बारसू स्थानिकांच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भेटी घेण्याची शक्यता आहे. बारसू मधील काही स्थानिकांची  रिफायनरी विरोधी भूमिका असताना स्थानिकांच्या बाजूने उभा असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नाणार ऐवजी रिफायनरीसाठी बारसू या गावात प्रकल्प करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला होता. त्यानंतर बारसूमध्ये रिफायनरीच्या हालचाली सुरू झाल्या.