उद्धव ठाकरे शपथविधी: निमंत्रित मान्यवरांसाठी मुंबई पोलिसांनी जाहीर केल्या Advisory, शिवाजी पार्कवर 'अशी' असेल प्रवेश व्यवस्था
Mumbai Police at Shivaji Park. (Photo Credits: PTI)

आज, 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवतीर्थावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी दिग्गज नेतेमंडळींसहित, सामान्य नागरिक तसेच शेतकरी इत्यादी अनेकांना आमंत्रण आहे. या वेळी तब्बल 70 हजार हजाराची आसनव्यवस्था असून सुव्यवस्थेसाठी 2000 पोलिसांचा फाटा सज्ज करण्यात आला आहे, यावरूनच आपल्याला या कार्यक्रमाच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी (Mumbai Police) मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाकरिता निमंत्रित विशेष मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, पत्रकार, शेतकरी व नागरिक व शिवसैनिकांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर केल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आमंत्रितांना वेगवेगळ्या प्रकारचे पास देण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ राजकीय नेत्यांसाठी लाल रंगाचे पास, राजकीय पक्ष प्रमुखांना गुलाबी पास, शेतकऱ्यांसाठी नारंगी पास, सामान्य नागरिकांना पांढरा पास, पत्रकार व मीडियासाठी पिवळा पास, देण्यात येणार आहे. संबधित आमंत्रितांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच शिवतीर्थावर प्रवेश घ्यायचा आहे. हे मार्ग व सूचना जाणून घ्या..

मुंबई पोलीस ट्विट

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करून ८० तासांच्या आतच बहुमत सिद्ध न करता आल्याने राजीनामा दिला होता. वास्तविक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले होते. मात्र याविरुद्ध महाआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तातडीने बहुमत चाचणी घेण्यासाठी विधानसभेला निर्देश देण्याची विनंती केली होती. यावेळी न्यायालायने निर्णय देत बहुमत सिद्ध करण्यासाठी ताबडतोब फ्लोर टेस्ट घेण्यास सांगितले होते. मात्र याआधीच फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला.

या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीने महाराष्ट्र सत्तासंघर्षाला वेगळा ट्विस्ट आला आहे.