उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे उपस्थित करणार, देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार का?
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच मन मोकळं केलं. या वेळी फडणीस यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे थोड्याच वेळात (सायंकाळी 6 वाजता) पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference) घेणार असल्याने ते या पत्रकार परिषदेत काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार?

  • आगामी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका व्यक्त करतील?
  • उद्धव ठाकरे यांनी फोनस स्वीकारला नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला प्रत्युत्तर मिळण्यीच शक्यता
  • शिवसेना एनडीएतून बाहेर पडत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापण करण्याची घोषणा
  • शिवसेनेने चर्चेची दारं बंद केली या आरोपाला प्रत्युत्तर

(हेही वाचा, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा माझ्या समोर झालीच नव्हती; देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार, शिवसेना पक्षप्रमुखांना पुन्हा धक्का)

वरील मुद्द्यांसह इतरही अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करु शकतील. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 नोव्हेंबर 2019) पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या विषयावर माझ्यासमोर कधीही चर्चा झाली नव्हती. जर ही चर्चा झाली असेलच तर ती आमचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झाली असावीत. त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा भाजपकडून नव्हे तर शिवसेनेकडूनच थांबली आहे. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी फोन स्वीकारला नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतील याबाबत उत्सुकता आहे.