राज ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचेही 'लाव रे तो व्हिडिओ'
Uddhav Thackeray, Raj Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ' असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धमाल उडवून दिली होती. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आजच्या पत्रकार परिषदेत 'लाव रे तो व्हिडिओ' या स्टाईलचा आधार घेतला. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवीत्रा घेत भाजपवर शरसंधान साधले. उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत दुष्यंतसिंह चौटाला यांनी भाजपवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ दाखवले. त्यामुळे उद्धव ठाकरेही राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'च्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेसाच होईल असे ठणकाऊन सांगितले. तसेच, अडीच आडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे ठरले होते. ते अमित शाह यांच्यासोबत ठरले होते. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनाही त्याबाबत माहिती होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (हेही वाचा, भाजपच्या मनात सत्तेची लालसा, गंगा साफ करता करता त्यांची मनंही कलुषित झाली: उद्धव ठाकरे)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीस यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे काही ठरलेच नव्हते आसा दावा केला. तसेच, मी अनेकदा कॉल केला मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन स्वीकारले नाहीत. चर्चेची दारं भाजपकडून नव्हे तर, शिवसेनेकडून बंद करण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणीस यांच्या सर्व आरोपांना उद्धव यांनी प्रत्युत्तर दिले.