भाजपच्या मनात सत्तेची लालसा, गंगा साफ करता करता त्यांची मनंही कलुषित झाली: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter /ANI)

मी भाजपला आजही माझा शत्रूपक्ष मानत नाही. पण, ठरुनही जर कोणी ठरलं नाही असं म्हणत असेल तर, तर ते मी कदापीही मान्य कणार नाही. मी माझा शिवसैनिक आणि जनतेसमोर खोटारडा अशी माझी प्रतिमा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून होऊ देणार नाही, असे भावनिक शब्द वापरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोप आणि दाव्यंवर प्रत्युत्तर दिले. भाजपच्या मनात सत्तेची लालसा आहे. गंगा साफ करता करता त्यांची मनंही कलुषित झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री पदाचं काही ठरलंच नव्हतं असतं असं म्हटल्यानंतर मी स्वत:हून संपर्क कमी केला, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोन न स्वीकारण्याच्या आरोपाला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

पहिल्यांदाच कोणीतरी मझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला - उद्धव ठाकरे

मला सांगायला वाईट वाटते पण महिल्यांदाच आज पहिल्यांदाच शिवसेना प्रमुखांचा मुलगा आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला. पण, अमित शाह आणि कंपनीने कितीही आरोप केले तरी, महाराष्ट्राच्या जनतेला महिती आहे कोण किती खरं बोलतं. मुख्यमंत्री पदाचं आमचं ठरलं होतं. पण, ठरुनही असं ठरलं नाही असं जर कोणी बोलत असेल आणि मला खोटं ठरविण्याचं प्रयत्न करत असेल तर ते मी कदापीही मान्य करणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला प्रश्न विचारावा?

शिवसेनेने विकासाच्या आड कधीही राजकारण येऊ दिलं नाही. मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही पाच वर्षात विकास केला परंतू, आमच्या सोबत असलेले आमच्यासोबत होते की नाही ते माहिती नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या अचाट कामांबद्दल सांगताना आम्ही जर त्यांच्यासोबत नसतो तर ते इतकी कामं करु शकले असते का हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा माझ्या समोर झालीच नव्हती; देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार, शिवसेना पक्षप्रमुखांना पुन्हा धक्का)

एएनआय ट्विट

अयोध्या प्रकरणी केंद्र सरकारला श्रेय घेता येणार नाही

अयोध्या प्रकरणात केंद्र सरकारला श्रेय घेता येणार नाही. हा सर्वोच्च न्यायलयाचा निकाल असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला या प्रकरणाचे श्रेय घेता येणार नाही, असेही उद्दव ठाकरे या वेळी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत युवा नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थीत होते.