Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

Mumbai Airport: महाराष्ट्रातील मुंबई कस्टमने दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. प्रवाशांकडून लाखो रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा-  कोल्डप्ले कॉन्सर्ट पासचे आश्वासन देऊन 18 वर्षीय विद्यार्थ्याची 2.17 लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल, तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर कारवाई करत ४ आणि ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कस्टमविभागाने छापा टाकला. कस्टमविभागाच्या अधिकाऱ्यांनी  दोन प्रवाशांना पकडून ८४ लाख रुपये किमतीचे  1.165 किलो सोने आणि 63.98 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रवाशांनी अंतवस्त्रात सोने लपवले होते. अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रवाशांची तपासणी केल्यानंतर सोने सापडले आणि त्यानंतर दोन्ही प्रवाशांची बॅग तपासली. या बॅगेत त्यांना विदेशी चलन सापडले. ६३.९८ रोख सापडली. या घटनेनंतर विमातळावर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोघावर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु केली आहे.