प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

बालकनीतील (Gallery) लोखडांच्या गजाला कुत्रा बांधण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी पुण्यातील कासारवाडी (Kasarwadi) येथील रामराजे निवास सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली.

गायत्री सुनील पावटेकर, असे मृत तरुणाचे नाव आहे. गायत्री सध्या इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री आपल्या पाळीव कुत्र्याला फ्लॅटच्या गॅलरीत बांधण्यासाठी गेली होती. परंतु, यावेळी कुत्रा हिंसक झाला. गायत्रीचे वडील सुनील पावटेकर यांनी सांगितले की, कुत्रा हिंसक झाल्याने गायत्रीने खिडकीवर चढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय, वाचा सविस्तर)

हा सर्व प्रकार अगदी अचानक घडला. त्यामुळे आम्हाला गायत्रीला वाचवता आले नाही. जेवणानंतर आम्ही सर्वजण फिरायला निघालो. मध्यरात्री कुत्रा जास्त भुंकायला लागला. त्यामुळे मी गायत्रीला कुत्र्याला गॅलरीत बांधण्यास सांगितले. तिने कुत्र्याने शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुत्रा अचानकपणे हिंसक झाला. त्यामुळे ती घाबरली. कुत्र्यापासून वाचण्यासाठी गायत्री खिडकीवर चढली. परंतु, यात तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली.

गायत्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कासारवाडी परिसरात खळबळ उडाली असून तिच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. औताडे यांनी सांगितले की, आम्ही या घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.