Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

बुलडाणा जिल्हयातील (Buldana District) प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याला (Police Personnel) कोरोनाची लागण झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथील प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 16 दिवसात जिल्ह्यात 24 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 2 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात गेल्या 59 दिवसांमध्ये 3 कोरोनाग्रस्ताचा बळी गेला आहे. (हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात टोळधाड दाखल; फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान)

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी 12 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले होते. यापैकी 3 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. यापैकी 18 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात 23 मे रोजी कोविड केअर सेंटरमधून मलकापूर पांग्रा, तालुका सिंदखेड राजा येथील आठ वर्षीय चिमुकलीला सुट्टी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी 2 हजार 91 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर पोहोचली आहे. यापैकी 16 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.