Mumbai: भररस्त्यात वकीलावर चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारीचे वार; पाहा मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ
Representational Image | (Photo Credits: PTI)

भररस्त्यात वकीलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali) परिसरात 8 जुलै रोजी घडली आहे. या हल्ल्यात वकील गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यदेव जोशी असे जखमी वकीलांचे नाव आहे. सत्यदेव जोशी हे 8 जुलै रोजी मुंबईच्या बोरिवली परिसरातून जात होते. त्यावेळी काही जणांनी भररस्त्यात त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी एमएचबी पोलिसांना 3 जणांना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे देखील वाचा- Pune: मुख्यध्यापकाचे विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य, पुण्यातील राजगुरूनगर येथील घटना

एएनआयचे ट्वीट-

आज एकाच दिवशी वकीलांवर हल्ला केल्याची दुसरी घटना घडली आहे. उस्मानाबाद येथेही एका वकिलावर प्राणघातक हल्ला केला आहे. न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत वकीलांवर हल्ला करण्यात आला आहे.