Sandeep Deshpande | (Photo Credits: Twitter/ANI)

Language Row: राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी अस्मितेच्या अजेंडासाठी इशारा दिला आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, 'महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्रद्रोहीच. ज्यांना मराठी मध्ये बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात. अन्यथा महाराष्ट्र द्रोह्याना त्यांची लायकी दाखवू.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी म्हटलं की, मराठी भाषेचा वापर करण्याचा आग्रह धरणे चुकीचे नाही, परंतु असे करताना जर लोक कायदा हातात घेत असतील तर ते सहन केले जाणार नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर यासारख्या मोठ्या महामंडळांसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांपूर्वी, मनसे मराठी भाषेचा अजेंडा पुढे नेत आहे. राज-ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष राज्यातील बँका आणि इतर संस्थांमध्ये मराठी भाषा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. (हेही वाचा -Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर (Watch Video))

संदीप देशपांडे यांची एक्स पोस्ट - 

बँक कर्मचाऱ्यांना मराठीत संवाद साधण्याचे आवाहन -

दरम्यान, गेल्या आठवड्यात, ग्राहकांशी संवाद साधताना मराठी भाषा न वापरल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांच्या दोन बँक व्यवस्थापकांना इशारा दिला होता. तथापि, गुढीपाडव्यानिमित्त आयोजित रॅलीत राज ठाकरे यांनी अधिकृत कामांसाठी मराठी सक्तीची करण्याच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर भर दिला होता. तसेच जाणूनबुजून मराठी न बोलणाऱ्यांच्या कानशीलात लगावली जाईल, असा गंभीर इशारा दिला होता.