Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर (Watch Video)

पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.

Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर (Watch Video)
CCTV Footage | Twitter/ANI

मनसे सरचिटणीस  संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी सात-साडेसातच्या सुमारास स्टंपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाता-पायाला जबर दुखापत झाली आहे. या हल्ला प्रकरणी काल पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. संदीप देशपांडे बीएमसी मधील काही कथित घोटाळे बाहेर काढत होते त्यावरून त्यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा त्यांच्या सहकार्‍यांचा आरोप आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आता त्यांच्या मागावर पोलिसांची 8 पथकं आहेत.

पहा सीसीटीव्ही फूटेज

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2023 09:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).