मुंब्रा: ऑन ड्युटी वाहतूक पोलीसांचा मोबाईल चोरी; चौघांना अटक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ऐरवी बाचाबाची शिवीगाळ करण्यापर्यत मजल असलेले वाहनचालक आता हातही उगारू लागले आहेत. महिला पोलिसांचा विनयभंग करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. एकंदरच वाहन चालकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव आणि आक्रमकपणाचा फटका तासन्‌तास चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना बसत आहे.

मुंब्रा (Mumbra) येथील कन्व्हर नाक्याजवळ कार्यरत असलेल्या वाहतुक पोलीसांसोबत (Traffic Police) अशाच एक प्रकार घडला. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारने त्याच्या मित्रांसह पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. या दरम्यान वाहतुक पोलिसांचा मोबाईल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.

वाहतूक नियमन करणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी थांबवले. वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून कागदपत्राची मागणी केली. परंतु त्यांच्याजवळ कागदपत्रे नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी पावती फाडून दुचाकी ताब्यात घेतली. यानंतर वाहनचालकाने त्याच्या मित्रांना फोन करुन बोलावले. त्यांनतर वाहनचालक आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांसोबत बाचाबाची करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर. वाहनचालकाच्या मित्रांनी थेट पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. यादरम्यान वाहतूक पोलिसाचा मोबाईल चोरीला गेला असल्याची माहिती समोर आली.

( हे देखील वाचा-नाशिक: भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची धडक लागून बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू)

अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरैशी आणि फैजान शेख असे आरोपीचे नावे आहेत. पोलिसांनी या चौघाला अटक करुन एकाचा शोध घेत आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी दिलेल्या माहिती नुसार, वाहतूक पोलिसांनी पावती फाडल्यामुळे त्यांना राग आला. त्यामुळे वाहनचालकाने त्याच्या मित्रासह वाहतूक पोलिसांना मारहाण केली.