प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

Gold Rate In Mumbai: मुंबईमध्ये सोन्याचे दराने (Gold Rate) एक नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे भावाने पस्तीशी पार केली तेव्हाच नागरिकांचा जीव वर खाली झाला होता. मात्र आता सोन्याचे दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याने चाळीशी पार केली आहे. आजचा सोन्याचा दर हा तब्बल 40,220.00 रुपये इतका झाला आहे. हे पाहून सोने खरेदी करणे तर दूर, ते आता फक्त वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळणार अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

आयएएनएस ट्विट - 

याबाबत सराफा बाजारातील काही जाणकार मंडळींनी माहिती दिली आहे. या जानेवारीपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिका आणि चीन यांच्यामधील वादाचाही परिणाम भारतातील सोन्याचे दरावर होत आहे. सोन्याच्या भावात काही काळासाठी घट झालीही होती मातर आता तारोण्याचे नव्या दराने इतिहास घडवला आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव अजून कमी होतील या आशेने दिवाळीत सोने घेण्याचे अनेकांनी ठरवले होते. मात्र आता या नव्या रेकॉर्डसह दिवाळीपर्यंत सोने 45 हजारांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा: ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेनंतर पुराच्या पाण्यात 25 तोळे सोने सापडले)

1 ते 6 ऑगस्टपर्यंत सहा दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळा 1,700 रुपयांनी वाढला होता. त्यावर 3 टक्के जीएसटी आकारून सोन्याचा प्रति तोळा दर 38, 200 झाला होता. 23 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याच दिवशी सोन्याचा दर 38, 970 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. मात्र आज सोन्याने नव्या विक्रमासह 40शी पार केली आहे.