सध्या देशभरात महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस झाले आहेत. परंतु, अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राज्यभरात राजकीय नेत्यांविषयी गुगल सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शिवसेना नेत संजय राऊत, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना युवा सेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविषयी गुगलवर सर्च (Google Search) करण्याचे प्रमाण कमी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव सर्वात जास्त सर्च केले जात आहे. सध्या गुगल ट्रेंडमध्ये (GoogleTrends) शरद पवार आघाडीवर आहेत. भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसला तरी गुगल ट्रेंडवर मात्र, पवारांची सत्ता असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यातील बैठकीला सुरुवात; काय होणार चर्चा?
रविवारी रात्री गुगल ट्रेंडवरील आकडेवारीनुसार, भाजपाने सत्तास्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शरद पवार यांच्या नावाने गुगल सर्च होण्याचे प्रमाण वाढले. या आकडेवारीनुसार, रविवारी रात्री ८ च्या नंतर पवार यांच्या नावावर अचानक सर्च वाढू लागले. रविवारपासून आतापर्यंत शरद पवार यांचे नाव गुगल सर्चमध्ये सर्वाधिक सर्च झाले आहे. सोमवारी दुपारी पवार यांच्या नावानंतर उद्धव ठाकरे यांचे नाव क्रमांकावर असून उद्धव ठाकरे यांचे नाव तिसऱ्या क्रमाकांवर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी अद्भूत विजय मिळवला. पवारांबद्दल महाराष्ट्रील सर्चचेप्रमाणे ६३ टक्के, उद्धव यांच्याबद्दल २१ टक्के तर फडणवीस यांच्याबद्दल १६ टक्के असल्याचे दिसून आले.
भाजप पक्षाने सरकार स्थापनेत असक्षम असल्याचे जाहीर केल्यावर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेची संधी दिली आहे. परंतु, शिवसेना पक्षाला आज त्यांचा निर्णय राज्यपालांना सांगायचा असल्याने शिवसेना पक्ष सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मदत घेऊ पाहत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्यास पोहोचले आहेत. त्यांची ही बैठक हॉटेल ताज लँड एंड्स इथे होत असून या बैठकीत काय चर्चा होणार हे मात्र अद्याप सांगण्यात आलेलं नाही.