ICSI (Photo Credit - Wikipedia)

नागरिकत्व कायद्यामुळे देशभरात सुरू असलेल्या हिंसाचार आणि आंदोलनाचे पडसाद आता राज्यातील शाळा, कॉलेजांवरही पडलेले पाहायला मिळत आहेत. 'द इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (ICSI) (The Institute of Company Secretaries of India) कंपनी सेक्रेटरीच्या (सीएस) आज (20 डिसेंबर) आणि उद्या (21 डिसेंबर) घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यानुसार, देशभरातील केंद्रांवर शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी संस्थेने गुरुवारी परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

आयसीएसआय कंपनीच्या सेक्रेटरी परीक्षा आजपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. यासाठी परीक्षा केंद्रेही निश्चित करण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून शुक्रवारपासून सुरू होणारे पहिल्या 2 दिवसांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. परंतु, सोमवारपासून (23 डिसेंबर) सर्व केंद्रांवर होत असलेल्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेतल्या जाणार आहेत. अद्याप संस्थेने परिक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. (हेही वाचा - Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक)

आयसीएसआय कंपनीकडून सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशन अशा दोन स्तरावर परीक्षा घेण्यात येते आहे. यामध्ये जुन्या व नव्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2020 महिन्यात जाहीर होणार आहे.