मुंबईत (Mumbai) एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मुंबईत दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी जाऊन लस देण्याचा विचार नाही. परंतु, वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना संकट काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगारांसह अत्यावश्यक सेवा पुरवणारी नागरिक जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. लवकरच मुंबई कोरोनावर मात करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबईत सध्या तरी 30 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु आहेत. तर 60 खासगी ठिकाणी लस दिल्या जात आहे. हे देखील वाचा- दिलासादायक! आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील- इक्बाल सिंह चहल
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. याचे श्रेय मुंबईकरांना जात आहे. तसेच डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांनाही महत्वाची भुमिका बजावली आहे. मुंबईत सध्या दुकानात गर्दी होताना दिसत आहे. दुकानदारांनी आणि ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना संकट काळात सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. स्वंशिस्तीने सर्वांनी समजून घेतले पाहिजे. कायम पोलिसांना पाचारण करणे योग्य नाही. पोलीस देखील योग्य काम करत आहे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.