कोरोना विषाणू (Coronavirus) सारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी प्रशासनाला दिले.
कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना एस.टी. मध्ये नोकरी दिली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना एस.टी. महामंडळामार्फत ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. pic.twitter.com/Kj25WF7n6h
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) June 1, 2021
कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. (हेही वाचा: खासगी रुग्णालयांमधील Covid-19 उपचाराचे दर निश्चित; जाणून घ्या तुमच्या शहरात कोविड रुग्णांकडून किती रुपये आकारले जाऊ शकतात)