
पालघर: कोविड-19 विरूद्ध 100 टक्के लसीकरण साध्य करण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात प्रशासनाने 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. पालघर जिल्हा मुख्यालयात गुरुवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
डीपीसीने 2021-22 या कालावधीसाठी जिल्ह्यासाठी 405.24 कोटी रुपयांची वार्षिक योजना मंजूर केली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोविड-19 लसीकरणासाठी प्रोत्साहन म्हणून, 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त निधीचे वाटप केले जाईल, असे ते म्हणाले. (हे ही वाचा Pune Lohegaon Airport 1 डिसेंबर पासून पूर्ण क्षमतेने खुलं होणार; रनवे चं काम अंतिम टप्प्यात.)
बैठकीत कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या किमान 12 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले, असेही ते म्हणाले.