Ranjeet Savarkar (Photo Credit: ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अपमान केला असून त्यांच्यावर योग्य काईवाई करण्यात यावी, अशी मागणी रंजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी सरकारकडे (Government) केली आहे. काँग्रेसकडून दिल्ली येथील रामलीला मैदानात शनिवारी भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय निंदनीय आहे, असे बोलत विरोधीपक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी राहुल गांधी यांनी झारखंड येथील एका सभेत मेक ईन इंडियाचा रेप ईन इंडिया असे उल्लेख केला होता. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली होती. त्यानंतर शनिवारी काँग्रेस पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे अयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे दैवत वीर सावरकर यांचा आपमान केला आहे. यामुळे सरकारने त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी वीर सावरकर यांचे नातू रंजीत सावरकर यांनी केली आहे. यावर सरकार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा-"मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली" आशिष शेलार यांच्याकडून शिवसेना पक्षावर टीका

एएनआयचे ट्वीट-

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अद्याप यावर राहुल गांधीची कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, याविषयावर राहुल गांधी काय मत मांडतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.