Ashish Shelar (Photo Credits: You Tube)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांनी अतिशय निंदनीय विधान केल्याचे विरोधीपक्षाचा आरोप आहे. यातच भाजप (BJP) नेते यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट शिवसेना पक्षावरच निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अपमान केला आहे. मात्र, मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली आहे. महाराष्ट्राचे दैवत वीर सावरकर यांच्या अपमानापेक्षा शिवसेना पक्षासाठी सत्ता मोठी ठरली आहे, या शब्दात अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणी राहुल गांधी यांनी मेक ईन इंडियाच्या जागी रेप ईन इंडिया असे वक्तव्य काढले होते. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली होती. त्यानंतर शनिवारी काँग्रेस पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे अयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. यावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्वीटरच्या माध्यामातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. "नाही धार "सच्चाई"कारांच्या शब्दांना आज दिसली"रोखठोक"लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली...सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली...नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली! या शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षावर शाब्दिक हल्ला चढवला. हे देखील वाचा- नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेसोबत तडजोड करण्यास तयार-आशिष शेलार

अशिष शेलार यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. परंतु, शिवसेना आणि काँग्रेस परस्पर विरोधी विचारधारेचे असल्यामुळे यांची सत्ता फार काळ टिकणार नाही, असे विधान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केले होते. यातच राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी शाब्दीक हल्ला चढवला होता. यावरुन दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे दिसते आहे.