Lonavla: दिल्लीतील बेपत्ता तरुण अभियंत्याचा मृतदेह लोणावळ्यात सापडला, चार दिवसांपासून होता बेपत्ता
Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्ली (Delhi) येथील अभियंता (Engineer) तरुणाचा लोणावळा (Lonavla) येथे मृतदेह आढळून आला आहे. हा तरुण 21 मे पासून बेपत्ता होता. दिल्लीवरुन तो खास ट्रेकींग आणि फिरण्यासाठी लोनावळा येथे आला होता. तो अचानक एकदिवस बेपत्ता झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. फरहान अहमद असे नाव असलेल्या या तरुणाला शोधून देण्याचे अवाहन करत त्याच्या आईवडीलांनी एक पत्रकही काढले होते. शोधून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीसही या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. अखेर मुलाचा मृतदेहच आज (24 मे) त्यांच्या हाती लागला आहे.

लोणावळा, खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांसाठी खास करुन ट्रेकींग करणाऱ्या मंडळींसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रच काय देशभरातील विविध ठिकाणांहून पर्यटक पर्यटणाच्या आनंदासाठी या ठिकाणी येत असतात. अशा पर्यकांपैकीच एक म्हणजे फरहान अहमद हा दिल्ली येथील अभियंता तरुण. ट्रेकिंग आणि पर्यटणाचा आनंद मिळविण्यासाठी तो इकडे आला. ट्रेकींगदरम्यानच बेपत्ता झाला. दरम्यान, या तरुणाने बेपत्ता होण्यापूर्वी काहीच काळ आगोदर आपल्या भावाला संपर्क करत ट्रेकिंगची माहिती दिली होती. दरम्यान, अल्पावधीतच त्याचा फोन बंद झाला. (हेही वाचा, Mumbai: सेक्स करताना मुंबईतील 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)

स्थानिक पोलीस आणि रेस्क्यू टीमने बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेच सापडला नाही. शेवटी आज त्याचा मृतदेहच आढळून आला. आयएनएसच्या लोकांनी तरुणाचा मृतदेह सापडला असून शोधमोहीम संपल्याचे जाहीर केले. तसेच, मदतीसाठी एनडीआरएफसुद्धा घटनास्थळी पोहोचल्याचे म्हटले आहे.