Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) सुमारे 28 हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा देण्यात येणाऱ्या मानधनापैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना 1955-56 पासून अ, ब व क या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे अदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आली असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. (हेही वाचा - मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नितीन राऊत यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, समीत ठक्कर नामक व्यक्तीवर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

दरम्यान, राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठिशी यापुढेही समर्थपणे उभा राहील, असं आश्वासनदेखील यावेळी अमित देशमुख यांनी दिलं आहे. त्यामुळे राज्यातील वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.