Thane Shocker: राहत्या घरात आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह, हत्येचा संशय, ठाण्यातील धक्कादायक घटना
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Thane Shocker: ठाण्यातील चितळसर- मानपाडा येछे एका वृध्द दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज वरून आरोपींचा शोध सुरु आहे.  या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतांची तपासणी केली होती. त्यावेळी दोन्ही मृतांच्या देहांवर जखमा आढळून आल्या होत्या, त्यामुळे दोघांची हत्या झाली असा दावा पोलिसांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वृध्द दामप्त्य ठाण्यातील मानपाडा परिसरामध्ये असलेल्या उच्चभ्रू सोसायटीत १४ व्या मजल्यावर राहत होते.समशेर बहाद्दुर सिंग (68) आणि मीना समशेर सिंग (65) असं मृत वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. गुरुवारी पोलिसांना दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दोघांना सुधीर नावाचा एक मुलगा आहे. तो अंबरनाथ येथे राहतो. दरम्यान गुरुवारी रात्री वृध्द आई वडिलांना भेटण्यासाठी आला. घरचा दरवाजा उघडताच आई वडिलांचा मृतदेह आढळून आला. याबाबत सुधीरने चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत. पोलिसांनी सुधीर याची देखील चौकशी केली आहे. या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे.