प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. विविध ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्य सरकारने सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. याच दरम्यान आता ठाणे महापालिकेकडून सुद्धा बंद असलेल्या एका ऑफिसमध्ये 1 हजार बेड्सची उपलब्धता असलेल्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे.

साकेत येथे सुद्धा अशाच पद्धतीची 1 हजार बेड्सची उपलब्धता असलेल्या रुग्णालयाची सुविधा गेल्याच आठवड्यात करण्यात सुरु आली होती. तसेच आणखी दोन रुग्णालये मुंब्रा आणि कळवा येथे सुद्धा उभारण्यात येणार आहेत. नागरिक संस्थेने असे म्हटले आहे की, त्यांच्याकडे सध्या 250 आयसीयु बेड्ससह 49 व्हेंटिलेटर्स आणि 371 ऑक्सिजनची सुविधा शहरात आहे.(COVID19: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा FabiFlu नावाच्या औषधावर आक्षेप; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहले पत्र)

नव्या सुविधेबबात सांगताना अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, 500 ऑक्सिजन बेड्स, 200 आयसीयु बेड्स आणि 300 रेग्युलर बेड्स आहेत. त्याचसोबत टेस्टिंग करण्यासाठी परिक्षण विभागाची स्वतंत्रपणे उभारणी करण्यात येणार आहे. सीटी स्कॅनर आणि डायलसिस सेंटर मध्ये डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ राहणार आहे.(महाराष्ट्र: भिवंडी मधील एका मस्जिदीचे COVID19 च्या केंद्रात रुपांतर, रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची उपलब्धता)

दरम्यान, ठाण्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यात तेथे 29488 रुग्ण असून 801 जणांचा बळी गेला आहे. तसेच 12424 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नियमात शिथिलता आणत काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावेळी अटी आणि नियमांसह सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अनिवार्य असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.