कोरोना विषाणूवरील लस काढण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, ड्रग कंटोलर जनलर ऑफ इंडिया कडून परवानगी मिळाल्यानंतर ग्लेनमार्क फार्मा (Glenmark Pharma) कंपनीने कोरोनावर फॅबीफ्लू (FabiFlu) नावाचे औषध बाजारात आणले आहे. मात्र, या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी फॅबीफ्लू नावाच्या औषधावर आक्षेप घेतला असून डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांना एक सविस्तर पत्रही लिहिले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी ग्लेनमार्क कंपनीने फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे. परंतु, परंतु या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे याची किंमत कमी करावी, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी पत्रातून केली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध प्रति टॅबलेट 103 रुपये किंमतीवर उपलब्ध असेल. पहिल्या दिवशी, 1800 मिलीग्रामचे दोन डोस घ्यावे लागतील. त्यानंतर, 800 मिलीग्रामचे दोन डोस 14 दिवसांसाठी घ्यावे लागतील. ग्लेनमार्क फार्मा यांनी सांगितले की, मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनाही हे औषध दिले जाऊ शकते. हे देखील वाचा- COVID19: मुंबईत रुग्णालयाबाहेर अन्यत्र झालेले एक हजार मृत्यू का दडवले? विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल
अमोल कोल्हे काय म्हणाले?
ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोरोनावर एक औषध बाजारात आणले आहे. एका गोळीची किंमत 103 रुपये इतकी आहे. करोनातून मुक्त होण्यासाठी रुग्णाला या गोळ्याचे 14 दिवसांत 122 गोळ्यांचे सेवन करायचे आहे. याची एकूण किंमत 12 हजारांच्या पुढे जाते. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का? असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी पत्रातून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही, असेही ते म्हणाले आहेत.
अमोल कोल्हे यांचे ट्विट-
ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोविड-१९ वर फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे.परंतु या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.त्यामुळे याची किंमत कमी करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री मा.@drharshvardhan जी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.#COVIDUpdates pic.twitter.com/dMRuUH67oo
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 25, 2020
कोरोनाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. भारतात एकूण 4 लाख 90 हजार 401 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 85 हजार 637 जण कोरोनामुक्त झाले आहेत.