मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. काल ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले होते. आज सुद्धा पावसाच्या सरी कोसळत असून महापालिकेला हायअलर्टचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. याच दरम्यान आता एमआरसीसी (MRCC) यांनी अर्नाळाच्या समुद्रात अडकलेल्या 16 मच्छिमारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हे सर्व मच्छिमार 70किमी अर्नाळा किनारपट्टीपासून दूर समुद्रात अडकले होते. मच्छिमारांकडील बोट खडबडीत स्थितीत आणि त्यावेळी वेगाने वारे वाहत असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(कोल्हापूर: राजाराम धरणाने पार केली धोक्याची पातळी; 34 रस्ते आणि 9 राज्य महामार्ग वाहतूकीसाठी बंद)
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अतिअत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले होते. तसेच नागरिकांना समुद्राच्या ठिकाणपासून दूर रहावे. कारण आज दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास समुद्राच्या उंच लाटा उसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.(Mumbai Rain Updates: दादर परिसरात इमारतीचा भाग कोसळला; शहरात अधून मधून जोरदार पाऊस, वारा Watch Video)
Mumbai's Maritime Rescue Coordination Centre (MRCC) successfully saved the lives of 16 fishermen in distress at sea about 70 km west of Arnala coast, Thane. The boat was caught up in very rough sea conditions & very high-speed winds prevailing at sea: Indian Coast Guard pic.twitter.com/muYCKvdozk
— ANI (@ANI) August 6, 2020
दरम्यान, मुसळधार पावसामुळे नायर हॉस्पिटलचा भाग जलमय झाल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडिओ समोर होता. त्यामध्ये नायर हॉस्पिटलच्या परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचसोबत मागील 24 तासांत सांताक्रुझमध्ये 162.3mm तर कुलाबा येथे 331.8mm पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आजही पालघर, मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरु आहे.