प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

ठाणे (Thane) येथे एका महिलेने मुलीला जन्म दिला. परंतु महिलेला कोरोनाची लागण झाल्याने या नवजात एका दिवसाच्या मुलीचा सांभाळ महिला कार्यकर्त्या यांनी केला. मात्र आता एक महिन्यानंतर अखेर या मुलीला तिच्या आईकडे सोपवण्यात आले आहे.नवजात मुलीच्या 34 वर्षीय आईला उपचारापूर्वी कोविडच्या रिपोर्टवरील नावाच्या गोंधळामुळे ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयात नाचावे लागले.(ठाणे येथील 44 वर्षीय महिलेला COVID19 चे दिले दोन विविध रिपोर्ट्स, तिसरी चाचणी केली असता निगेटिव्ह)

या मुलीचे नाव राजनंदिनी असून तिला मनसेच्या कार्यर्त्या समिक्षा मारकांडे यांनी काही दिवसांसाठी तिला आपल्याकडे ठेवले होते. कारण राजनंदिनीला जन्म दिल्यानंतर 14 जुन रोजी तिच्या आईला तातडीने कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले. या मुलीचे वडिल सुनील लहोरिया यांनी असे म्हटले आहे की, माझ्या पत्नीने 30 जुन रोजीच कोरोनावर मात केली होती. परंतु नवजात मुलीला आईकडे सोपवण्यासाठी अजून 10 दिवस असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ज्यांनी माझ्या मुलीचे सांभाळ केला अशा देवदूतांचे पुरेसे सुद्धा आभार मानू शकत नाहीत.(पश्चिम उपनगरीय भागात वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भाकडे मुंबई महापालिकेचे लक्ष)

मुलीचा महिनाभर सांभाळ केल्यानंतर मारकांडे परिवाराने जड अंत:करणाने तिच्या आईकडे तिला सोपवले आहे. ती परिवाराची सदस्य बनली होती पण आता तिच्याशिवाय घर खाली वाटत आहे. आम्हाला तिची खुप आठवण येईल असे समिक्षा यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 61869 वर पोहचला असून 1646 जणांचा बळी गेला आहे. तर 26489 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर ठाण्यात कालपासून ते येत्या 19 जुलै पर्यंत पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात फक्त कामावर जाणाऱ्या व्यक्तींना परवानगी असणार आहे.  याआधी पुणे, औरंगाबाद, नांदेड याठिकाणी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे.