पश्चिम उपनगरीय भागात वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भाकडे मुंबई महापालिकेचे लक्ष
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहेत. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. याच दरम्यान मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि मालाड येथे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकानी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणच्या इमारतींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

काकानी यांनी गेल्या चार आठवड्यांच्या अखेरीस पश्चिम उपनगरीय भागात भेट दिली होती. तर अंधेरी पूर्व येथे त्यांनी अधिक वेळ देत तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी मुंबई मिरर यांच्याशी बोलताना असे म्हटले आहे की, कोविड19 चा प्रादुर्भाव का वाढत आहे. त्याचसोबत अन्य इमारतींकडे लक्ष देण्यासह आता सर्वाधिक कोरोनाच्या ठिकाणी पाहिले जाणार आहे.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या किती? जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)

मुंबई महापालिकेचे कर्मचारी विविध इमारती मधील संस्थापकांसोबत मिटिंग करत आहेत. त्यानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण कसे मिळवावे या मुद्द्यांबाबत त्यांना समजावून सांगत आहेत. ताप क्लिनिकची स्थापना करुन तेथे अँटीजेन चाचण्या करण्यात येतील. त्याचसोबत स्थानिकांची ऑक्सिजनची पातळी तपासणे हे मोठे काम आहे. सोसायट्यांना मार्गदर्शक सुचना ही दिल्या जाणार असून काय करावे आणि काय करु नये याबाबत व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून सांगितले जाणार असल्याचे काकानी यांनी स्पष्ट केले आहे.

ऐवढेच नव्हे तर सोसाट्यांमधील घरकाम करणाऱ्या महिला आणि ड्रायव्हर यांच्यासंदर्भात कोणती खबरदारी घ्यावी याबाबत ही सांगण्यात येणार आहे. तर चहूबाजूंना लावण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये पॉलिथिन स्क्रिन असावी असे ही त्यांनी सुचवले आहे. या गाड्यांमधून जाणाऱ्या व्यक्तीने हात स्वच्छ करण्यासह गाडीचे हँडल निर्जंतुकीकरण करावे. तर सोसायट्यांना लिफ्टसह त्यांची बटणे, कॉमन ऐरिया आणि इमारतीच्या पायऱ्यांचे सुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात यावे.(राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती)

पश्चिम उपनगरीय भागात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आक्रमकतेने कामे केली जात असल्याचे काकानी यांनी म्हटले आहे. सध्या मुंबईतील के ईस्ट वॉर्ड येथे कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 6,148 रुग्ण आढळून आले असून वाढण्याचा वेग 1.2 टक्के आहे. पी नॉर्थ वॉर्ड मध्ये 5,692 कोरोनाचे रुग्ण असून 1.8 टक्के वाढीव वेग आहे. पी साउथ येथे 2,848 कोरोनाबाधित असून 1.3 टक्के वाढीव वेग तर आर साउथ येथे 3,728 कोरोना संक्रमित रुग्ण असून वाढण्याचा वेग 2.3 टक्के आहे. याच प्रमाणे आर सेंन्ट्रल वॉर्डमध्ये 3,727 रुग्ण असून ग्रोथ रेट 2.8 टक्के आणि आर नॉर्थ येथे 2,146 कोरोनाबाधित रुग्ण असून ग्रोथ रेट 2.2 टक्के आहे.